Saturday, 18 October 2025

‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण

 ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे

महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

 

मुंबईदि. ८ : राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणपायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ज्याप्रमाणे लंडन म्हणजे युकेची ओळख आहेत्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योगवित्तशिक्षणनगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi