Saturday, 25 October 2025

राज्यभर नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावण्यासाठी राज्यपाल हे स्वतः दौरे करणार

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीराज्यभर नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावण्यासाठी राज्यपाल हे स्वतः दौरे करणार आहेत.या परिषदेमुळे सहभागी शेतकरी आणि जाणकार लोकांच्या ज्ञानात भर पडेल. राजभवनापुरती ही परिषद मर्यादित न ठेवता लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या विभागात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. गटशेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीकडे  जास्तीत जास्त शेतकरी  वळले पाहिजेत  हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'व्हिजनआहेत्यामध्ये महाराष्ट्र देखील योगदान देत आहे. सध्याचे हवामानातील बदल पाहता नैसर्गिक शेती परिषदेची आणि संवादाची नितांत आवश्यकता आहे. आपण देखील शेतकरी आहोत शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहोत असे सांगताना जलताराचे श्री श्री रविशंकरनाम फाऊंडेशननानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सेवाभावी संस्था देखील नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देत आहेत त्यांचे देखील सहकार्य घेण्याची गरज आहे. राज्यपाल यांच्या नैसर्गिक शेतीतील अनुभवाचा फायदा राज्याने घ्यावा. नैसर्गिक शेतीकडे वळून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवावा असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi