Friday, 24 October 2025

आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, अधिकारी- कर्मचाऱ्यांना विहित वेळेत वेतन

 मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, अधिकारी- कर्मचाऱ्यांना विहित वेळेत वेतन दिले दिले पाहिजे. वेतन वेळेत न देणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत मंत्री आबिटकर म्हणले, किमान महिन्याच्या सात तारखेपर्यंत कंत्राटी सेवेतील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन झाले पाहिजे. यासाठी आवश्यक अनुदानाची मागणी संबंधित आरोग्य उपसंचालक यांनी १५ तारखेपर्यंत शासनास सादर करावी.


मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, प्रत्येक अधिकाऱ्यांनी कंत्राटी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय प्राधान्याने घ्यावा. शासनाकडून वेतनासाठी देण्यात आलेल्या अनुदानाचा नियमित आढावा घ्यावा. वेतन नियमित देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. जिल्ह्यात डॉक्टर्स, कंत्राटी सेवावरील अधिकारी-कर्मचारी यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेले अनुदान, झालेला खर्च याचा नियमित आढावा संबंधित आरोग्य उपसंचालकांनी नियमितपणे घ्यावा. वेतनासाठी देण्यात आलेले अनुदान खर्ची न झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. वेतनासाठी शिल्लक अनुदान पुढील आठ दिवसात खर्च झाले पाहिजे. भविष्यात या विषयी कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi