ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून माओवाद पसरवणाऱ्या भूपतीसारख्या माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. "ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिला गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.
No comments:
Post a Comment