Tuesday, 28 October 2025

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो

 मालवणीचा गोडवाठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार

 ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली

 

मुंबईदि. २८ : मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणाराकोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिकनाटककाराला आपण मुकलो आहोतअशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'वस्त्रहरण या विक्रमी नाटकासहइतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईलअसेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

'अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या  मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील 'वस्त्रहरण'  वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहेही त्यांच्या लेखनाची ताकद राहीली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीकला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीयमराठी रंगभूमी चळवळत्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असूनत्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिकनाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi