गावात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात याव्यात. जिथे नियमित कचरा एकत्र करण्यात येतो. अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सुशोभीकरण करावे. शाळांमार्फत रॅली, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी, आणि जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवावे असे निर्देश दिले.
अतिरिक्त मिशन सचिव रौंदळ यांनी यावेळी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
१७ सप्टेंबर २५ ते २ ऑक्टोबर २५ दैनंदिन कार्यक्रम
१७ सप्टेंबर- राज्यस्तरीय शुभारंभ
१८ सप्टेंबर- प्रबोधनपर उपक्रम
१९ सप्टेंबर- कचरा वर्गीकरण, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, स्पर्धा
२० सप्टेंबर - प्लास्टिक वापरण्याबाबत जनजागृती, शून्य कचरा, उपक्रम, ३-आर मोहिम
२१ सप्टेंबर - कंपोस्ट खत,शोष खड्डा निर्मिती
२२ सप्टेंबर - अस्वच्छ ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता, शास्त्रीयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट.
२३ सप्टेंबर - "एक झाड आईच्या नावे", गृहभेट जनजागृती
२४ सप्टेंबर - सायकल मॅरेथॉन, रॅली, मानवी साखळी
२५ सप्टेंबर - “एक दिवस, एक घंटा, ‘एकत्र” श्रमदान उपक्रम
२६ सप्टेंबर- प्रकल्प उद्घाटन
२७ सप्टेंबर - ग्रामपंचायत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा
२८ सप्टेंबर -सफाई मित्र सुरक्षा शिबिर
२९ सप्टेंबर -शाळांमध्ये स्वच्छता धडे
३० सप्टेंबर -स्वच्छता वाहने व उपकरणांचे नूतनीकरण
१ ऑक्टोबर- स्वच्छता प्रतिज्ञा
२ ऑक्टोबर -ग्रामसभा व स्वच्छता दिवस
०००००
No comments:
Post a Comment