Sunday, 21 September 2025

मुंबई शहर जिल्हाअंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रम

 मुंबई शहर जिल्हाअंतर्गत

सेवा पंधरवडा कार्यक्रम

 

मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने त्रिमूर्ती प्रांगणमंत्रालय व विल्सन महाविद्यालयगिरगांव येथे सेवा पंधरवडा कार्यक्रम झाला.

नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेवसाईटफेसबुक पेजअधिकृत चॅनेलला फॉलो करुन शासनाच्या सेवांबाबत माहिती घेण्याचे तसेच सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, तहसिलदार (सामान्य प्रशासन) संदिप आवारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi