Sunday, 21 September 2025

भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा

 भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा

- केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश देताना म्हणाले कीभारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा मोलाचा वाटा आहे. भारताला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कुशल मनुष्यबळाचे नितांत आवश्यकता आहे. केंद्रीय कौशल्य विकास विभाग विविध कौशल्य विषयक योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवत आहे. आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ.विनीता अग्रवाल, महाराष्ट्र राज्याच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

कौशल्य विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण पहिल्या सत्रात पार पडले. पहिल्या सत्रात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आदी राज्यांनी त्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ.विनीता अग्रवाल, डॉ. निना पाहूजा यांनी सादरीकरण केले.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi