Thursday, 18 September 2025

केंब्रिज’सोबतचा करार शालेय शिक्षणात ऐतिहासिक पाऊल -

 केंब्रिज’सोबतचा करार शालेय शिक्षणात ऐतिहासिक पाऊल - डॉ. पंकज भोयर

महाराष्ट्र राज्य प्रशासनपायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांत सातत्याने नवे आदर्श निर्माण करत आहे. आज केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे शालेय शिक्षणात जागतिक दर्जाकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहेअसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले. हा करार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आणि नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण व नेतृत्वक्षम तरुणांना दिशा देणारा ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात पीएम श्री स्कूल्स सुरू असून त्या शाळा शैक्षणिक उत्कृष्टताकौशल्य विकास आणि सर्वांगीण शिक्षणासाठी आदर्श ठरणार आहेत. आपल्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये लाखो सामान्य कुटुंबातील मुले असामान्य स्वप्ने पाहतात. या मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर दर्जेदार गुणवत्ता प्रमाणपत्र मिळावेयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्याकडे आपण पुढे पाऊल टाकले असल्याचे डॉ. भोयर म्हणाले.

या ज्ञान भागीदारीतून हवामान शिक्षणअभ्यासक्रम सुधारणाग्रंथालय व शैक्षणिक साधनसंपत्ती उपलब्ध करून देणेशिक्षक क्षमतावृद्धी आणि ओपन स्कूलिंग उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. ही मोहीम केवळ गुणपत्रिका सुधारण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासकौशल्य व जागतिक स्तरावरील तयारी देण्यासाठी आहेअसेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत’ दृष्टीकोनातून महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेलअसा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. केंब्रिजसोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi