Friday, 19 September 2025

नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता' विषयावरील चित्रकला स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

 नवा भारत-सांस्कृतिक महासत्ताविषयावरील चित्रकला स्पर्धेत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

 

मुंबईदि.१८ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'नवा भारत-सांस्कृतिक महासत्ताया विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महानगरपालिकेच्या ३४५ शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

गुरुवार,  १८ सप्टेंबर २०२५ रोजी तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. पहिल्या गटात इयत्ता पहिली ते चौथीदुसऱ्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी आणि तिसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले. पहिल्या गटासाठी रंगभरण स्पर्धादुसऱ्या गटासाठी शिवकालीन गड किल्लेऑपरेशन सिंदूरडिजिटल भारत आणि तिसऱ्या गटासाठी नवा भारत-सांस्कृतिक महासत्तामहाराष्ट्राची समृद्ध संस्कृतीबदलता भारत हे विषय देण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi