Sunday, 21 September 2025

रोजगार हमी योजनेतंर्गत २० जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्याचा

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपैलवान चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू काश्मीर येथे एक हजार पैलवानांनी देशातील सैनिकांसाठी रक्तदान केले होते. आजच्या दिवसांचे औचित्य साधून रोजगार हमी योजनेतंर्गत २० जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्याचा शुभारंभ होत आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत राष्ट्र प्रथमआत्मनिर्भर भारतस्वदेशीऑपरेशन सिंदूरपर्यावरण असे विविध विषय घेऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये विविध योजनांद्वारे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे.

 राज्यातील नगरपालिकानगर परिषदानगरपंचायती यामध्ये ३९४ ‘नमो गार्डन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जलसंधारण  विभागामार्फत ७५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीची अवजारेयंत्रसामग्रीचे वाटप देखील प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे. उद्योग विभागामार्फत नमो कौशल्य केंद्रऑटोमोबाईल कौशल्य केंद्रकृषी उद्योग कौशल्य केंद्र असे विविध उपक्रम देखील सुरू होत आहेत. मराठी भाषा विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या ५० देशांपर्यत वाढविण्यासाठी मनो वैश्विक संपर्क समन्वय अभियान’ देखील आजपासून सुरू होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi