शासकीय पडिक जमिनीवर बांबू लागवडीचा विचार
श्री. फडणवीस म्हणाले की, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था (इको सिस्टिम) तयार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर बांबूच्या मागणी व पुरवठा साखळीवरही भर द्यावा लागणार आहे. बांबूचे उत्पन्न मिळण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो, हा कालावधी मोठा आहे, त्यामुळे संशोधकांनी बांबूच्या अशा जाती शोधाव्यात की ज्या दोन वर्षांत उत्पन्न देतील. बांबू बरोबरच नेपिअर गवत एकत्र लावल्यास त्याचा फायदा होईल. बांबू उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या खरेदी धोरणात बांबुच्या वस्तूंचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment