बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे
- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह
मुंबई, दि. २५ : ज्या देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र पूर्णपणे प्रगत झाले आहे. तोच देश जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. भारतालाही २०४७ पर्यंत सर्वच क्षेत्रात विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करावे लागणार आहे. त्यासाठी बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
इंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘इंडियाज बेस्ट बँक्स’ पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका, संपादक श्यामल मुजुमदार, कार्यकारी संपादक ऋषीराज उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे. देशामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. जग विकसित आणि विकसनशील अशा दोन भागात विभागले आहे. विकसित देश त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विकसनशील देश कर्जाने ग्रासले आहेत. मात्र भारत कल्याणकारी योजना, वित्तीय सुधारणा आणि खंबीर नेतृत्वामुळे विकासाची गाथा पुढे नेत आहे.
No comments:
Post a Comment