मागील दहा वर्षात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे ४४ लाख कोटी रुपयांचे विविध योजनांच्या लाभाचे वितरण थेट बँक खात्यात करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येकापर्यंत बँक जोडण्यात आली आहे. बँकांवरील कर्जाचा भार कमी करून एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) २.५ टक्के ठेवण्यात यश आले आहे. बँकिंग तंत्रज्ञान सुधारण्यासाठी चार 'आर' वर काम करण्यात आले आहे. यामध्य रिकनाईझ, रिकव्हर, रिकॅपॅबिलिटीज आणि रिफॉर्म यांचा समावेश आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, बँकांनी मागील काळात झालेल्या वित्तीय सुधारणांचा अभ्यास करून शासनाला भविष्यातही काही सुधारणा करावयाच्या असल्यास त्या सुचवाव्यात. नुकत्याच केंद्र शासनाने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा केल्या आहेत. कुठल्याही विक्री करामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात आहे. वित्तीय विषयक गुन्ह्यांमध्ये दंड अधिक करण्यात आला आहे. तसेच कायद्यांमध्ये बदल करून बँकिंग सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यात आल्या आहेत
No comments:
Post a Comment