Wednesday, 17 September 2025

पर्यावरणीय संकटाचा वाढता धोका

 पर्यावरणीय संकटाचा वाढता धोका

मनुष्य प्राण्याला पृथ्वीवर सुखा-समाधानाने जगण्यासाठी 33% भूभाग हा वनाच्छादित असला पाहिजे. जी पृथ्वी गेल्या दोन हजार वर्षात ०.५ डिग्री सेल्सिअसने तापली होती. तीच पृथ्वी औद्योगिकरणानंतर गेल्या दीडशे वर्षात 1.5 डिग्री सेल्सिअसने तापली. हे सगळं कशामुळे झाले तर जीवाश्म इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा कोळशाचा वारेमाप वापर इंधन म्हणून केला गेला. परिणामी वातावरणातील कार्बन उत्सर्जन वाढले. याच गोष्टींचा अतिरेकी वापर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे. पृथ्वीतलावर 350 पीपीएम कार्बन उत्सर्जन असेल तर जीव- जंतू व्यवस्थित जगू शकतात. आज याच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे 427 ते 430 पीपीएम पर्यंत पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आयपीसीसी (Intergovernmental Panel on Climate Change) नुसार 450 पीपीएम कार्बन उत्सर्जन झाल्यावर पृथ्वीवर विनाश घडणार आहे. आयपीसीसी च्या अहवालात 2030 मध्ये शंभर दिवसात पडणारा पाऊस हा 52 तासात पडेल असा इशारा देण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi