Friday, 19 September 2025

जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

 


जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

मुंबई (प्रतिनिधी) । इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषदेने ‘इतिहास महाराष्ट्राचा : श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यभरात २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई येथे संपन्न झाली.
उपक्रमाचा उदघाटन सोहळा शनिवार (दि.१३) रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील मुख्य रंगमंचावर संपन्न झाला. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ सिने अभिनेते विनयजी येडेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नकांतजी जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, स्पर्धेचे परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर, त्र्यंबक वडसकर, सीमा यलगुलवार, शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, वैभव जोशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत, आगामी उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली.
शनिवारी महाराष्ट्रातील ३६ संघांनी आपले समूह सादरीकरण या उपक्रमात सादर केले. बालकलावंतांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना शिवकाळातच नेले. सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. समूह गटात सर्वोत्कृष्ठ - श्रीराम अॅकेडमी, कोल्हापूर, उत्कृष्ठ - श्री महावीर स्थानकवासी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जालना, उत्तम - न.प. शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय, रत्नागिरी, प्रशंसनीय १ - गुरुवर्य परशुराम विठोबा विद्यालय, जळगाव, प्रशंसनीय २ - आर्ट ऑफ फन अॅकेडमी, बीड, विशेष नावीन्यपूर्ण सादरीकरण - ग्रॅव्हिटी डान्स इन्स्टिट्यूट, धुळे यांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

एकल सादरीकरणात बालकलावंतांचा जल्लोष

रविवारी (दि.१४) इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमातील एकल सादरीकरणाची स्पर्धा झाली. या स्पर्धेत वयोगट ५ ते १० व ११ ते १५ अशा दोन गटात राज्यभरातील ६७ बालकलावंतांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावले. सुरुवातीला परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. गटनिहाय स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यात एकल सादरीकरण ५ ते १० वयोगटात सर्वोत्कृष्ट - आयांश जाधव, लातूर, उत्कृष्ठ - क्तस्तुरी कार्लेकर, नवी मुंबई, उत्तम - अनुष्का साठे, अहिल्यानगर, प्रशंसनीय १ - रुद्रप्रताप जाधव, मंगळवेढा, प्रशंसनीय २ - ध्वज मुणोत, अहिल्यानगर, विशेष प्रशंसनीय पारितोषिक - सिध्दी पाटील (बीड), मुद्रा दामले (ठाणे), हार्दिका दिनकर (कल्याण)  तर  ११ ते १५ वयोगटात सर्वोकृष्ठ - दुर्व दळवी, बृहन्मुंबई, उत्कृष्ठ - समर्थ मुंडे, परभणी, उत्तम - विधित भोसले, नवी मुंबई, प्रशंसनीय १ - इशा गोखले (रत्नागिरी), प्रशंसनीय २ - पार्थ पवार (बीड), विशेष उल्लेखनीय पारितोषिक - कौमुदी सालपेकर (नागपूर), स्वरेशा आखाडे (रत्नागिरी), ईश्वरी रंजन (नवी मुंबई), वैभवी बगाडे (जळगाव) या बालकलावंतांनी पारितोषिक पटकावले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर व त्र्यंबक वडसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची युथ टीम शहबाज गोलंदाज,  निरंजन सागवेकर, सागर सकपाळ, राहुल मंगळे, मोहित पाटील, दर्शील सोनुले, चेतन उपाध्याय, अभिषेक आयरेकर, सुरेखा मराठे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi