आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. 26 : माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज ‘आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपसंचालक गोविंद अहंकारी, विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेषांकामध्ये शिवकालीन गडकिल्ले, शस्त्रे, पत्रव्यवहार, चलन, जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज, विचार आणि आदर्श आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हेच या विशेषांकाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांनी स्वतः रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग व मूर्ती मंत्री ॲड. शेलार यांना भेटस्वरूप दिली.
हा अंक महासंवाद - https://mahasamvad.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment