Thursday, 18 September 2025

राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून – कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया

 राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून – कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया

        - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जिल्हा व राज्यस्तरीय उत्कृष्ट  सेविकामदतनीस व अंगणवाडी पुरस्काराची घोषणा

 

मुंबई, दि. १८ : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असूनसुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहेअसे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ   महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारेउपायुक्त श्रीमती संगीता लोंढेउपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह अधिकारीपर्यवेक्षकमुख्य सेविकासेविकामदतनीस हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेचनवनियुक्त मदतनीस व सेविका यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi