बांबू लागवडीमुळे शाश्वत पर्यावरण विकासासह
ग्रामीण विकास व हरित महाराष्ट्राला चालना
- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
- जागतिक बांबू दिनानिमित्त येथे परिषद
मुंबई, दि. १८ :- पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल, पृथ्वीचा ऱ्हास टाळायचा असेल तर वृक्ष लागवडीबरोबर बांबू लागवड हाच मुख्य पर्याय आहे. बांबू लागवड ही शाश्वत पर्यावरण विकासासह शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती करणारी ठरणार आहे. राज्य शासन हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
जागतिक बांबू दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'मित्रा' व फिनिक्स फाउंडेशन लोदगा, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बांबू फॉर पीपल, प्लॅनेट ॲण्ड प्रॉस्पीरिटी’ या परिषदेचे उद्घाटन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मालविका हर्बोफार्माचे संचालक दिनेश शर्मा, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप प्रेसिडेंट आणि कॉर्पोरेट अफेयर्स प्रमुख राकेश स्वामी, रॉयल कॅस्टर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक
No comments:
Post a Comment