Sunday, 21 September 2025

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांसाठी १०९ शिक्षकांची निवड सोमवारी पुरस्कारांचे वितरण

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव 

पुरस्कारांसाठी १०९ शिक्षकांची निवड

सोमवारी पुरस्कारांचे वितरण

 

मुंबईदि. २१ - सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशींनुसार शासनाने एकूण १०९ शिक्षकांची निवड केली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत प्राथमिकमाध्यमिक तसेच आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक यांचा समावेश आहे.

यामध्ये : प्राथमिक शिक्षक – ३८माध्यमिक शिक्षक – ३९आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे प्राथमिक शिक्षक – १९आदर्श शिक्षिका पुरस्कार (क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार) – विशेष शिक्षक कला/क्रीडा – दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक – स्काऊट/ गाईड शिक्षक – २ अशा प्रकारे एकूण १०९ शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचा वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते सोमवारदिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi