महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून
सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे
– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. २३ : केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रम जाहीर केले आहेत. राज्यातील ग्रामीण भागापर्यंत सहकार चळवळ पोहोचविण्यासाठी आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
मंत्रालयात रत्नागिरी जिल्हा सहकारी मंडळाच्या विविध अडचणींचा आढावा घेण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सहकार आयुक्त दीपक तावरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. तर सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील तसेच सहकार विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, ग्रामीण भागापर्यंत सहकार चळवळ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा सहकारी मंडळाला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडून आवश्यक निधी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात सहकार आयुक्तांनी सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिले.
000
No comments:
Post a Comment