Wednesday, 17 September 2025

पर्यावरणाचे असंतुलन चां परिणाम

 अलीकडेच अमेरिकेमध्ये 24 तासात 11 किलोमीटर लांबीच्या आणि अकरा लाख हेक्टर वरील जंगलाला वणवा लागला. जंगल जळून खाक झाले. सॅन फ्रान्सिसकोमध्ये सेलिब्रिटी राहत असलेल्या भागात दोन लाख घरांची जळून राख झाली. फ्रान्समध्ये हिरव्यागार द्राक्षबागा जळून गेल्या. इस्रायल देशामध्ये मध्ये इतकी मोठी आग लागली की ती विझवणे हे इस्रायल सारख्या प्रगत देशाला आटोक्याबाहेर गेले. कधी नव्हे ते यंदा युरोपचे तापमान हे 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. आपल्या देशात उत्तरकाशीमध्ये संपूर्ण एक गाव 30 सेकंदामध्ये वाहून गेले.उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावाजवळील खीरगंगा परिसरात 6 ऑगस्ट 2025 रोजी  ढगफुटीमुळे (cloudburst) अवघ्या काही सेकंदात प्रचंड पाणी आणि मलबा खीरगंगा नदीतून गावाकडे आलाज्यामुळे धाराली गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. या आपत्तीत 50 हून अधिक घरे नष्ट झाली, 4 जणांचा मृत्यू झालाआणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले. बाजारपेठावस्त्याआणि गुरेढोरेही पाण्यात वाहून गेले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi