Friday, 12 September 2025

पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक

 पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. ११ : राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील, असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विधानभवन येथे गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारीसंघटनेचे पदाधिकारी यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

पोलीस पाटलांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ करणेपोलीस पाटलांसंदर्भातील तक्रारीची चौकशी उपविभागीय अधिकारी स्तरावर करणेरिक्त पदाची भरती व अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यात पोलीस पाटलांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने व सकारात्मकपणे पाहिले जाईल.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi