व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठक
मुंबई, दि. २५ : राज्याला २०४७ पर्यंत 'विकसित महाराष्ट्र' करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे. भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजे, असे व्हिजन डॉक्युमेंट पथदर्शी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली
No comments:
Post a Comment