Tuesday, 26 August 2025

गणेशोत्सव आणि स्वयंसहाय्यता गटांचा अनोखा संगम

 गणेशोत्सव आणि स्वयंसहाय्यता गटांचा अनोखा संगम

महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणपती बाप्पाचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात केले जाते. यंदा नाशिक, बीड आणि पालघर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गट तसेच स्थानिक कारागीर आपल्या हस्तकौशल्याची जादू सादर करणार आहेत.

दालनात खादी, बटिक, बांधणी, वारली चित्रकला, चामड्याची उत्पादने, दागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भाविकांना आकर्षित करणार आहे. विशेष म्हणजे, लाइव्ह किचनद्वारे ताज्या खाद्यपदार्थांची निर्मिती आणि आस्वाद घेण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे भाविकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा थेट अनुभव घेता येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि ग्रामीण उद्योजकतेचा अनोखा संगम घडवून गणेशोत्सवाला अविस्मरणीय स्वरूप देणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi