Thursday, 28 August 2025

उद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणार

 उद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणार

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

दोन महिन्यात अभ्यास गटाने उपाययोजना सुचवण्याचे निर्देश.

 

 मुंबईदि.27: उद्योजकांच्या निमा या नाशिक येथील संघटनेमार्फत वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करावी. यामध्ये उद्योजकांचे प्रतिनिधी व महावितरणचे अधिकारी यांचा समावेश असेल या समितीच्या अभ्यास गटामार्फत दोन महिन्यात संघटनेच्या मागण्यांबाबत उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी  दिले.

मुंबई येथील एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे नुकतीच उद्योजकांच्या संघटनेसोबत राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्यामहाराष्ट्रात प्रथमच वीज दर कमी होत आहे मात्र औद्योगिक ग्राहकांना शासन स्तरावर अजून वीज दराबाबत काय लाभ देता येतील, याकरिता सदर समितीच्या माध्यमातून उद्योजकांच्या वीज दराबद्दल असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी निमा या उद्योजकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आणि महापारेषण महावितरण यांचे अधिकारी यांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यास गटामार्फत सदर वीज पुरवठा व विजेचे दर या अनुषंगाने असलेल्या मागण्या व त्यादृष्टीने उपाय सुचविण्यात येतील. या उपाययोजनांचा उपयोग उद्योगांच्या वीजदर समस्या दूर करण्यासाठी होईल तसेच या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईलअसे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi