राज्यातील 38 नवीन सब स्टेशन उभारणी आणि
वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करावे
-ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई, दि. 27: राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना या विकासासाठी उद्योग, कृषी आणि विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात वीज ऊर्जेची गरज भासणार आहे यासाठी महावितरणमार्फत उभारण्यात येणाऱ्या 38 नवीन सब स्टेशन आणि वीज वाहिन्यांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जावे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.
एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय फोर्ट येथे आढावा बैठक ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.
No comments:
Post a Comment