Friday, 8 August 2025

पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी

 पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी

किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी

-         गृह राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. ७ : राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत कार्यवाही करण्यात यावी,  असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

राज्यमंत्री योगगेश कदम म्हणालेराज्यात विविध पोलिस ठाण्यात १८०० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना अन्य विभागामध्ये देण्यात येत असलेले वेतनभत्ते याप्रमाणे लाभ देण्यात यावे. राज्यातील सर्वच रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन असावे. त्यानुसार गृह विभागातील रोजंदारी सफाई कामगारांनाही वेतन देण्यात यावे.

 

विभागातील कायम असलेल्या सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. या कामगारांना २०१७ च्या शासन निर्णयानुसार वेतन अदा करताना मागील थकबाकीही देण्याबाबत चर्चा केली असूनकुठल्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश राज्यमंत्री श्री कदम यांनी दिले.

 

बैठकीस पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखेउपसचिव रवींद्र पाटीलमहाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भटजीवन सुरुडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi