Tuesday, 26 August 2025

महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी जागा उपलब्ध करून द्यावी

 महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी

जागा उपलब्ध करून द्यावी : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषि मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसर येथे प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी स्थापन करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या जमिनीसहित एमआयडीसीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. मौजे जंक्शन,मौजे भरणेवाडी,मौजे अंथुर्णे,मौजे लासुर्णे येथील जमिनीसहित या क्षेत्रालगत असलेल्या शेती महामंडळाचे सलग १००० एकर क्षेत्र नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावे. या 'एमआयडीसीमुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi