Tuesday, 26 August 2025

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार

 महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २५ :  महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांनी रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी मागणी केली. कामगारांच्या मागणी संदर्भात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात येईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही सांगितले. राज्य शेती महामंडळाच्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकरव्ही.सी.व्दारे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी व राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi