उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 26 : “श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादानं महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध आणि प्रगतिशील होवो,” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी गणेश भक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, “संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक पर्व राहिलेले नाही, तर तो लोकसहभाग, लोकजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव झाला आहे. यंदा महायुती सरकारने गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा राज्योत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment