Wednesday, 27 August 2025

लंडनमधील 'महाराष्ट्र भवन' साठी ५ कोटींचा निधी

 लंडनमधील 'महाराष्ट्र भवनसाठी ५ कोटींचा निधी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

      मुंबई दि. २६ :- लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावेया अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळलंडन या संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करुन तेथे महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याने तेथील महाराष्ट्र मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

             महाराष्ट्र मंडळलंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणेहा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमउत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi