लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती.
दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज विस्तारित सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1
• मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे.
• सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आली होती.
• प्रकल्पाची एकूण लांबी 5.50 किमी असून यापैकी 3.85 कि.मी. लांबी 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
• सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.
• पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.
No comments:
Post a Comment