सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना चालना द्यावी
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
- नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्र्यांशी भेटीत चर्चा
नवी दिल्ली, दि. 20: महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली.
मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पालखी मार्गामधील अडथळे दूर करावेत तसेच फलटण ते पुणे हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली.
No comments:
Post a Comment