राज्यात १८ विभागांमार्फत एकूण २५५ योजना राबविल्या त्यापैकी ३९ योजना महिलांसाठी, १८६ योजना बालकांसाठी आणि ३० योजना महिला व बालकांसाठी एकत्रितपणे राबवल्या आहेत. यासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९८ टक्के बजेटचा प्रभावी वापर झाल्याचे समाधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, महिला व बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समित्यांची अंमलबजावणी प्रभावी व्हावी. तसेच या योजनांचे सामाजिक परिणाम तपासण्यासाठी संशोधनावर विशेष भर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील
No comments:
Post a Comment