Tuesday, 26 August 2025

शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य मोबदला मिळण्यावर भर देणार -

 शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य मोबदला मिळण्यावर भर देणार - पालकमंत्री जयकुमार रावल

मनमाड-इंदौर रेल्वे प्रकल्पातील नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्गात 24 गावे बाधित होत आहेत. यापैकी काही गावे महानगरपालिका हद्दीत तसेच काही गावे ग्रामीण भागातील आहेत. शेतकऱ्यांची स्वमालकीची शेतजमीन रेल्वे प्रकल्पासाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. तथापि त्यांना भूसंपादन कायदा आणि प्रचलित दराप्रमाणे आणि इतर शासकीय निकषाप्रमाणे जमिनीचा जास्तीत जास्त न्याय्य मोबदला मिळावायावर भर देण्यात येईल, असे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. याबाबत धुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांसमवेत चर्चा करुन प्रकरण निहाय फेरतपासणी करण्याचे आदेश श्री.बावनकुळे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi