मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान
कोल्हापूर दि. 17 : जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत, 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरिक्षक महेश इंगळे - श्रीराम कन्हेरकर , पो.ह तानाजी शेंडगे , महिला पोलीस संगिता वराळे, लिपीक विष्णू परीट यांना देण्यात आल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने , आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते .
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नुतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तसेच या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या वास्तुविशारद, बांधकाम कंत्राटदार यांचा ही सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला .
No comments:
Post a Comment