Tuesday, 19 August 2025

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त असे 168 शासकीय निवासस्थान बांधण्याकरिता

 कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त असे 168 शासकीय निवासस्थान बांधण्याकरिता शासनाकडून सुमारे 34 कोटी 62 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकात दिली .या बांधकामाकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित( मुंबई ) यांच्यामार्फत या कॅम्पसमध्ये एकूण A,B,C अशा सात मजली तीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी 538 चौ फूट क्षेत्राचे टू बीएचके 56 फ्लॅट असे एकूण 168 फ्लॅट बांधण्यात आलेले आहेतया ठिकाणी लिफ्टची सोयगार्डन एरियातसेच प्रशस्त पार्किंग, मुलांसाठी प्लेग्राउंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सोलर सिस्टिम अग्निशामकमंदिरएसटीपी प्लांट अशा सोयीयुक्त तसेच 24 तास संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांकरिता विसाव्यासाठी सुंदर कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस संकुलाला, ' राजर्षी छत्रपती शाहू महाराज पोलीस संकुल असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस विभागातील इतर अधिकारी - कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi