बारामती शहरात मुख्य ठिकाणी 'सिग्नल यंत्रणा' बसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि.१०: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी 'सिग्नल यंत्रणा' बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्री. पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर व ध्वजस्तंभ, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
श्री. पवार म्हणाले, नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात ३० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून त्यांचे गतीने काम पूर्ण करा. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्यादृष्टीने कामे करतांना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा. परिसरात विद्युत रोषणाई होईल, याबाबत दक्षता घ्यावी. नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे स्पष्ट नामफलक लावावेत. सेवा रस्त्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत.
No comments:
Post a Comment