महाराष्ट्राची जागतिक झेप - पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील
‘टीटीएफ’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसा, हिल स्टेशन, समुद्रकिनारे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाची जिवंत उदाहरणे असलेले गड किल्ले, युनेस्को स्थळे असे वैविध्यपूर्ण पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी फायदा झाला. शिवाय, महाराष्ट्र राज्याने या प्रदर्शनात सहभाग दर्शविल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी अधिक रुची दाखविली. त्यामुळे येत्या काळात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेईल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.
*
No comments:
Post a Comment