शहरी विकासाचा आराखडा राबविताना
पुढील ५० वर्षांचा विचार आवश्यक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· शहरी विकासासाठी एकत्रित थीम, दीर्घकालीन नियोजन आणि निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश
· महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत आराखड्यावर चर्चा
मुंबई, दि. २६ : शहरी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी एकत्रित थीम, दीर्घकालीन नियोजन आणि उपलब्ध निधीचा प्रभावी वापर या सूत्राचा वापरा करा. शहरांच्या भविष्यासाठी आज निर्णय घ्या, पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रातील शहरी भागांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन आर्थिक आराखड्यावर चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
राज्यातील शहरी भागातील पायाभूत सुविधा व नागरी सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन करण्याविषयी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment