विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी
विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार
ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, दस्तावेजांसाठी सुलभता
विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत.
No comments:
Post a Comment