कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)
• कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.
• कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या 340 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रुंदीच्या पुलासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.
• उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरात, ही केवळ काही मिनिटांची नव्हे, तर दररोज हजारो तासांची बचत होईल.
०००००
No comments:
Post a Comment