Monday, 28 July 2025

धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे - pl शेअर

 धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे - या धोरणाचे उद्दिष्ट वस्तुनिष्ठ विदा (डेटा) आधारित निर्णय प्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वतपरवडणारीपर्यावरणपूरक आणि हवामान बदल सहनशील निवास व्यवस्था निर्माण करणे आहे.

अ. धोरणाची उद्दिष्टे

  1. गृहनिर्माण सुलभता: २०३० पर्यंत सर्वांसाठी परवडणारीपर्यावरणपूरक व आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन गृहनिर्माण सुलभतेचा उद्देश साध्य करणे.
  2. गृहनिर्माण गरज सर्वेक्षण व विश्लेषण : २०२६ पर्यंत राज्यभरजिल्हा-निहाय गृहनिर्माण सर्वेक्षण करून पुराव्यावर आधारित नियोजन करणे.
  3. आर्थिक वृद्धी व गतिमानता : गृहनिर्माण क्षेत्राचा आर्थिक वाढीस चालना देणारा घटक म्हणून विकास करणेरोजगार निर्मिती व संबंधित उद्योगांना पाठबळ देणे.
  4. पर्यावरणीय शाश्वतता : गृहनिर्माणासाठी पर्यावरणपूरक साहित्य व तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
  5. परवडणारी घरे : राज्यातील अतिदुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्याशाश्वतसुरक्षित घरांची निर्मिती करणे.
  6. झोपडपट्टी पुनर्वसन : झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे व राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणेझोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र साध्य करणे.
  7. शहरी नियोजन व पायाभूत एकात्मिक सुविधांचा विकास : गृहनिर्माणास रस्तेपाणीमलनिःस्सारण इत्यादी आवश्यक पायाभूत सुविधांशी जोडून संघटित विकास साधणे.
  8. 'वॉक टू वर्कसंकल्पना: गृहनिर्माण व रोजगाराच्या संधी यांचा परस्परासंबंध प्रस्थापित करून प्रवासाचा वेळ कमी करणे.
  9. नियमन व अंमलबजावणी: दर्जासुरक्षितता व परिणामकारक देखरेख सुनिश्चित करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रातील नियमन अद्ययावित करणे.
  10. भाडे तत्त्वावरील गृहनिर्माण : प्रोत्साहन व सक्षम नियामक आराखड्याद्वारे राज्यात भाडे तत्त्वावरील घरांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणे.
  11. सर्वसमावेशक वाढ : ज्येष्ठ नागरिकविद्यार्थीनोकरदार महिला व औद्योगिक कामगार यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा विचार करणे.
  12. आधुनिक तंत्रज्ञान : टिकाऊकिफायतशीर व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
  13. स्वशासकीय संस्था व विचारवंतांचा सहभाग : धोरण अधिक लोकाभिमुख व भविष्यवेधी बनवण्यासाठी स्वशासकीय संस्था व विचारवंतांचा सहभाग.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi