Monday, 28 July 2025

धोरणाची तत्त्वे - परवडणारी, सर्वसमावेशक, शाश्वत आणि पुनर्निर्माणशील ही या धोरणाची

 . धोरणाची तत्त्वे  - परवडणारीसर्वसमावेशकशाश्वत आणि पुनर्निर्माणशील ही या धोरणाची चार मुख्य तत्त्वे आहेत.

  1. परवडण्याजोगे:
    • परवडणाऱ्या दरात जमीनचटई क्षेत्र निर्देशांक (FSI) प्रोत्साहनशुल्कात सवलत इत्यादींद्वारे घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे.
    • आर्थिक सहाय्य व गृहनिर्माणासाठी वित्त पुरवठा करून स्वस्त किमतीत घरे उपलब्ध करणे.
    • बांधकाम स्वस्त असले तरी गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे किमान निकष पाळणे.
  2. सर्वसमावेशक :
    • आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी सामाजिक गृहनिर्माण व आर्थिक सहाय्य.
    • ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग रहिवाशांना सर्व गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे.
    • नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितपरवडणाऱ्या आणि दर्जेदार घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे.
  3. शाश्वत :
    • गृहनिर्माण बांधकामादरम्यान पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पद्धतींचा वापर सुनिश्चित करणे ("कमी वापरपुनर्वापर व पुनर्निमाणशील" - Reduce, Reuse, Recycle).
    • ऊर्जा कार्यक्षमतानूतनीकरणक्षम ऊर्जा एकत्रीकरणजलसंधारणशाश्वत व पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीचा वापरकार्यक्षम जागेचे नियोजन यास प्रोत्साहन.
    • हरित इमारत मानकांचा समावेश करणे आणि हरित इमारत प्रमाणपत्रांसाठी प्रोत्साहन देणे.
  4. पुनर्निर्माणशील :
    • हवामान बदल विचारात घेऊनपर्यावरणाचा ऱ्हास कमी करणारेआपत्तींमुळे होणारी हानी मर्यादित करणारे आणि आपत्तीनंतर पुनर्निर्माण सुलभ करणारे गृहनिर्माण आवश्यक आहे.
    • यात जमिनीचा सक्षम वापरपर्यावरणपूरक इमारतींचे नियोजनटिकाऊ बांधकाम साहित्यपूररोधक व पूरनियंत्रण नियोजनउष्मारोधक बांधकाम साहित्यतंत्र व तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi