Tuesday, 29 July 2025

राज्य महोत्सवामुळे गणेशोत्सवात विविध उपक्रम pl share

 राज्य महोत्सवामुळे गणेशोत्सवात विविध उपक्रम

एका लोगोचे अनावरणव्याख्यानमालाअध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल. राज्यातील महत्वाची मंदीरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या घेता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील. घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटोव्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपराकला संस्कृती दर्शवलेली आहे अशा चित्रपटाचा विशेष गौरव करण्यात येईल. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ड्रोनशो चे आयोजन करणे प्रस्तावित आहे. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमउपक्रम हाती घेण्यात येतील. गणेश उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येईल.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi