Tuesday, 22 July 2025

गडचिरोली देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनविण्याचा,एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ pl share

 गडचिरोली देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनविण्याचा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

·         एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

·         कोट्यधीश’ वृक्षसंख्येचा मान मिळवणारा गडचिरोली हा देशातील पहिला जिल्हा ठरणार

 

गडचिरोलीदि.22 (जिमाका) : राज्यात सर्वांधिक वनाच्छादित अशा गडचिरोली जिल्ह्याची ओळख ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ म्हणून आहेचपरंतु आता हा जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व वनाच्छादित जिल्हा बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हरित महाराष्ट्रसमृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एक कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वालवन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकरआमदार धर्मरावबाबा आत्रामआमदार डॉ. मिलिंद नरोटेआमदार रामदास मसराम,  जिल्हाधिकारी अविश्यंत पंडाउपमहानिरीक्षक अंकित गोयलजिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पलमुख्य वनसंरक्षक रमेश कुमारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडेउपवनसंरक्षक श्रीमती आर्या आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले२०१४ ते २०१९ या काळात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहम यशस्वी झाली होतीज्याचा सकारात्मक परिणाम केंद्र सरकारच्या अहवालात नमूद आहे. याच अनुभवाच्या जोरावर आता ११ कोटी वृक्ष लागवडीपासून पुढे २५ कोटी वृक्ष लागवडीपर्यंतचा टप्पा राज्य सरकारने निश्चित केला असूनत्या दिशेने पावले टाकली जात आहेत. महाराष्ट्राचे वनसंतलन गडचिरोलीमुळेच राखले गेल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi