Tuesday, 22 July 2025

माओवादमुक्त गडचिरोली आणि विकास प्रक्रियेत सहभागाचे आवाहन,स्थानिकांना आरोग्य आणि शिक्षणाची हमी

 स्थानिकांना आरोग्य आणि शिक्षणाची हमी

उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील. प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंतचा उपचार शासन मोफत देत आहेज्यामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाहीअसे त्यांनी सांगितले.

माओवादमुक्त गडचिरोली आणि विकास प्रक्रियेत सहभागाचे आवाहन

माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीचा विकास सुरू झाला असताना आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या, 'मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. अशा अफवांपासून सावध राहाकारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात असे त्यांनी स्पष्ट केले.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, वाढदिवसाच्या दिवशी हजारो लोक भेटण्यासाठी उत्सुक असतानाही मुख्यमंत्री गडचिरोलीत उपस्थित राहिले हे या जिल्ह्याप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारतआणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित महाराष्ट्रसंकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. विकासाच्या या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी केले.

लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविकात प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेतेमाजी आमदार डॉ. देवराव होळीकृष्णा गजबेरमेश बारसागडेप्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi