बनावट शासन निर्णय; गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार
-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई दि.१८:- अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट शासन निर्णयाच्या आधारे केलेल्या कामासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई, हलगर्जीपणा केलेल्या संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात लेखाशीर्ष २५१५ १२३८ मध्ये बनावट शासन निर्णयाच्या आधारे झालेल्या कामांच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनीं सांगितले, बनावट शासन निर्णयाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात लेखाशीर्ष २५१५ १२३८ मधून ६ कोटी ९५ लाखाची ४५ कामे मंजूर केल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच याबाबत तातडीने संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले. गुन्हे दाखल करण्यास स्मरणपत्र पाठवूनही ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यास विलंब केला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच बनावट शासन निर्णय संदर्भात चौकशी करून दोषींवर गुन्हा दखल केला जाईल
No comments:
Post a Comment