कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण करणार
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १६ :- कोल्हापूर शहराच्या लगत असलेल्या ४२ गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात येईल. ही कार्यवाही पुढील दोन महिन्यात पूर्ण करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण घोषित करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले, कोल्हापूर शहराच्या लगत असलेल्या गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात करवीर तालुक्यातील ३७ गावे व हातकणंगले तालुक्यातील ५ गावांचा सामावेश आहे. सद्य स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजना मंजूर असून या योजनेतील तरतुदीनुसार विकास परवानग्या दिल्या जात आहे
No comments:
Post a Comment